उल्हास साबळे विरूद्ध खंडणीचा गुन्हा रद्द नव्हे तर तांत्रीक मुद्द्यांचे आधारे परत

जळगाव : उल्हास साबळे व आनंद शर्मा यांच्या विरोधात जैन इरिगेशनतर्फे सी.एस. नाईक यांनी दाखल केलेला खंडणीचा व ट्रेसपासचा खटला हा जिल्हा न्यायालयाने फक्त तांत्रीक बाजुमुळे रद्द केला असुन त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबत अपील करण्यात आल्याचे सी. एस. नाईक यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे.

पत्रकात असेही नमुद आहे की, साबळे यांनी पत्रकार परिषदेत खोटी व दिशाभुल करणारी माहिती दिली असल्याने त्याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात येत असुन त्याबाबत सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

ज्युडीशीयल मॅजीस्ट्रेट यांनी श्री. नाईक यांच्या तक्रारीवर स्पष्टपणे आदेश केले आहे की, तक्रारीत नमुद गुन्हा हा दखल पात्र गुन्हा असुन त्याचा तपास होणे आवश्यक असल्याने पोलीसांनी सी.आर.पी.सी. १५६(३) करून दोषारोपण सादर करावे.

सदर १५६(३) चे कनिष्ट न्यायालयाने आदेश देतांना श्री. नाईक यांनी जी तक्रार एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला दिली होती. त्याची प्रत तसेच त्या तक्रारीवर एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनने काहीच कारवाई न केल्याने श्री. नाईक यांनी मा. पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष  भेटून त्या तक्रारची प्रत देऊन तसा सही-शिक्का पोलीस अधीक्षक कार्यालयातुन घेऊन ते न्यायालयात सादर केले होते.

सी.आर.पी.सी. १५४(३) प्रमाणे पोलीस अधीक्षक यांना सदरची तक्रार बाय रजिस्टर पोस्टाने पाठविणे आवश्यक असल्याने व श्री. नाईक यांनी ही रजिस्टर पोस्टाने न पाठवता बाय हॅन्ड दिली असल्याने त्या एकमेव तांत्रीक उणीवमुळे मा. जिल्हा न्यायालयाने रिव्हजन अर्ज मान्य करून कनिष्ट न्यायालयाने आदेश सेट अ साईट केले आहे.

मा. जिल्हा न्यायालायाने कोठेही नमुद केलेले नाही की, हा गुन्हा झालेला नाही वा हा गुन्हा होत नाही किंवा गुन्हा घडलेला नाही वास्तविक पाहता कोर्टाने स्पष्टपणे म्हटले आहे की गुन्हा घडलेला आहे व तो गुन्हा दखलपात्र असल्याने पोलीसांनी चौकशी करावी परंतू फक्त तांत्रीक मुद्द्यांचे आधारे सदर कनिष्ट न्यायालायाचे आदेश रद्द करण्यात आले आहे.

उच्च न्यायालायात हा तांत्रीक मुद्द्यांला आम्ही आव्हान दिले असल्याने त्याचा निकाल लागताच पुनश्चः या खटल्याचा तपास पोलीसांना करावाच लागेल असे श्री. नाईक यांनी पत्रकात म्हटले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *