वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी – जयकुमार रावल

नंदुरबार : राज्य शासनाची महत्वाकांक्षी उपक्रम असलेली 50 कोटी वृक्ष लागवड मोहीम ही काळाची गरज असल्याने ही मोहीम लोकचळचळ होण्यासाठी आपण सर्वांनी किमान प्रत्येकी पाच वृक्ष लावण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज जिल्हा पोलीस कवायत मैदानावर जिल्हास्तरीस वृक्ष लागवड मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी केले.

प्रारंभी पालकमंत्री श्री.रावल याच्या शुभहस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष रत्नाताई रघुवंशी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, पंचायत समिती सभापती रंजना नाईक, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, प्रातांधिकारी वान्मती सी., जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपवनसंरक्षक एस.बी. केवटे, ए.टी. थोरात, विभागीय वनअधिकारी आर.एन. जेजुरकर उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याहस्ते कै.माजी मुख्यमंत्री व हरित क्रातींचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषि दिवसाचे औचित्य साधत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिप प्रज्वजलनाने व वृक्ष पुजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करुन नंदुरबार जिल्ह्याचा 20 वा वर्धापन दिनानिमित्त उपस्थित जनतेला पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्री जयकुमार रावल यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी असून प्रत्येकाने एक वृक्ष लावला तरी 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मी खास अभिनंदन करतो कारण त्यांनी ही चळवळ दोन वर्षापूर्वी सुरु केली व या चळवळीला आता लोकचळवळीचे स्वरुप आले आहे.

ते पुढे म्हणाले की, 200 ते 300 वर्षापासून मानवाने निसर्गाकडून घेण्याचे काम केले असून आता मानवाला निसर्गाला देण्याची वेळ आली असून त्यासाठी प्रत्येकाने किमान पाच वृक्षांची लागवड करुन आपले योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

जयकुमार रावल पुढे म्हणाले की, नंदुरबार जिल्हा विकासाच्या महामार्गावर असून अनेक महत्त्वाचे हायवे जिल्ह्यातून जात असून यासाठी वृक्ष लागवडीचे काम महामार्गावर होणे गरजेचे आहे. जिल्ह्याला 45 लाख उद्दिष्ट्य असतांना 51 लाख खड्डे खोदून 31 जुलै अखेर हे उद्दिष्ट्य पूर्ण होणार असून यासाठी मी जनतेला व प्रशासनाला धन्यवाद देतो. सातपुड्यात पूर्वीच्या काळी वाघ व इतर प्राणी राहत होते. वृक्ष नसल्यामुळे प्राणीही गेले त्यासाठी सातपुड्याचे गतवैभव प्राप्त होण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज असून यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जयकुमार रावल पुढे म्हणाले की, हे शासन शेतकरी व कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवित असून शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून कांदाचाळ, शेततळे, अस्तरीकरण, शेडनेट, यासाठी 50 टक्के अनुदानावर योजना असून एकात्मिक फलोत्पादन विकास योजना, मागेल त्याला शेततळे, राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा अभियान तसेच आत्मा योजनेतून भाजीपाला, मिनीकीट चारा उत्पादनासाठी प्रात्यक्षिके असे अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी लाभ घेवून आपला विकास साध्य करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आ.डॉ. विजयकुमार गावीत म्हणाले की, वृक्ष लागवडीचा महत्वपूर्ण उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला असून हा उपक्रम प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे. पहिल्याने जून महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असे परंतु आता कालचक्र बदलेले असून आता जुलै महिन्यात पाऊस येतो. याला आपणच कारणीभूत आहोत. परिणाम या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम झाला असून प्रत्येकाला निरोगी शरीर ठेवायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. जिल्ह्यात जलसंधारणाचे काम चांगल्या प्रकारे झाल्यामुळे भविष्यात पाणी टंचाईला आळा बसेल जलयुक्त शिवारासारखे लोक चळवळीतून झालेले कामे हे विकासाचा मार्ग दाखवितात असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी पालकमंत्री जयकुमार रावल व उपस्थितांच्या हस्ते राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून कांदाचाळ शेततळे, अस्तरीकरण, शेडनेट यासाठी 50 टक्के अनुदानावर योजनेतून शेतकऱ्यांना अनुदानाचे व प्रमाणपत्राचे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विहिर, ठिबक, विज जोडणीसाठी तसेच बिरसामुंडा कृषी क्रांती योजनेतून प्रतिनिधीक स्वरुपात जिल्हयातील शेतकऱ्यांना प्रमाणपत्र व बि-बियाणांचे वाटप करण्यात आले.

यावेळी होळ तर्फे रनाळा येथील उत्कृष्ट शेतकरी म्हणून केंद्रस्तरावर केंद्रीय कृषि मंत्री राधासिंग यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शेतकरी सुरेश आनंदा पाटील यांचाही पालकमंत्र्यांनी प्रमाणपत्र देवून गौरव केला.व वन विभागातर्फै काढण्यात आलेल्या समन्वय अधिकारी पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार विभागीय वन अधिकारी आर.एन. जेजुरकर यांनी केले. या कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *