कोलंबो – आता मोफत व्हिसाव्दारे भारतीय पर्यटकांना श्रीलंकेत एन्ट्री मिळणार असून यासाठी श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघें यांनी समिती नेमली होती. श्रीलंका सरकारने हा निर्णय त्यासमितीच्या शिफारसीनुसार घेतला आहे. भारतीय पर्यटकांची संख्या श्रीलंकेला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये लक्षणीय आहे.
गेल्या काही वर्षांपासून श्रीलंकेतील सैन्यामध्ये संघर्ष सुरु असल्यामुळे या देशाला पर्यटकांची पसंती मिळत नव्हती. श्रीलंका सरकारने याचा अभ्यास करून फ्री व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. भारत चीन तसेच युरोपीय देशातील पर्यटकांचा अभ्यास समितीने केला आहे. श्रीलंकेत ऑक्टोबर ते नोव्हेंबर आणि मार्च ते एप्रिल या कालावधीत नियम लागू करण्यात येईल. त्यानूसार दिलेल्या चार महिन्यात पर्यटकांना फ्री व्हिसा मिळणार आहे.
श्रीलंकेला पर्यटक म्हणून भेट देणाऱ्यात भारताचा नंबर पहिला लागतो. दोन लाखाहून जास्त भारतीय पर्यटकांनी २०१७ मध्ये श्रीलंकेला भेट दिली आहे. त्यानंतर चीनच्या एक लाख छत्तीस हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. भारतीयांना श्रीलंकेला जाण्यासाठी २० डॉलर म्हणजे जवळपास १४०० रूपये भरावे लागत असे. यासाठी पर्यटकांना ऑनलाइन अर्ज भरावे लागत होते.