‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘पिकांना उत्पादन खर्चाच्या दिडपट किमान आधारभूत किंमत (हमी भाव)’ या विषयावर राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार, दि. १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत पत्रकार सुरेश ठमके यांनी घेतली आहे.

शेतमालांच्या किमान आधारभूत किंमतीत केंद्र शासनाने नुकतीच केलेली वाढ, आधारभूत किंमती जाहीर केल्यानंतर त्या किंमती प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कशा मिळतील, पीक पेऱ्यांच्या संकलनासाठीची अधिसूचना, हंगाम २०१७-१८ मध्ये एमएसपी ऑपरेशन कोणकोणत्या पिकांसाठी राबविण्यात आले, पेरणीचे सूक्ष्म नियोजन व अचूक संकलन, शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी पीक पेऱ्याचा वापर, नोंदणी करण्यात येणारी पिके तसेच शेतकऱ्यांना पेरण्यांच्या नोंदणी संदर्भात जागरूक करण्याबाबतची माहिती श्री.पटेल यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *