मुंबई – मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून येत्या ६ ऑगस्टपासून मल्टिप्लेक्समध्ये जाऊन सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही ते पाहणार असून कान चेक आंदोलन असे नाव या आंदोलनाला देण्यात आल्याची माहिती दिली आहे.
१ ऑगस्टपासून मल्टिप्लेक्स बाहेरचे खाद्य प्रेक्षकांना नेता येणार असून या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश सरकारने दिले आहेत. योग्य पद्धतीने या आदेशाची अंमलबजावणी होत आहे की नाही? हे मनसेच्या कानचेक आंदोलनात तपासले जाणार आहे. जर याची अंमलबजावणी होत नसेल तर मल्टिप्लेक्सच्या स्टाफला कानाखाली लगावून कानचेक आंदोलन होणार आहे.
Please follow and like us: