मनियार बिरादरी तर्फे ३०४ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

(जळगाव)  जळगाव जिल्हा मनियार बिरादरी तर्फे मेहरून येथील अनवारुल उलूम तर्फे चालवली जात असलेली शेखुल हिन्द उर्दू प्राथमिक शालेतिल ३०४ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख अतिथि म्हणून बिरदारीचे अध्यक्ष फ़ारूक़ शेख,खजिनदार ताहेर शेख, मदरसा चे प्रभारी मौलाना नासिर खान हजर होते.
शाळेचे मुख्याध्यापक जानिसार अख्तर यांनी शालेचा आढावा सादर केला त्यात बिरादरी मागील १० वर्षा पासून अखंडित पणे शालेय विद्यार्थ्यांना सहकार्य कारित असल्याने शाळा प्रगति पथावर असल्याचे आवर्जून सांगितले.
फ़ारूक़ शेख यांनी मनोगत व्यक्त करतांना शिक्षकांचे अत्यंत कमी वेतनात चांगले कार्य बाबत बिरादरी तर्फे आठही शिक्षकांना विशेष असे पैकेज देण्याचे घोषित केले.
मौलाना नासिर यांनी आशीर्वाद पर भाषण केले
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षक अरशद शेख यांनी केले तर आभार शिक्षक वासिम खान यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेतिल शिक्षक रुबीना काज़ी,शिरीन शेख,हामिद पठान,शाहिद अहमद, यांनी परिश्रम घेतले.

फोटो -विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करतांना ताहेर शेख,फ़ारूक़ शेख,मौलाना नासिर,जानिसार अख्तर व इतर शिक्षक दिसत आहे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *