५९४ रुपयांत ६ महिने अनलिमिटेड कॉल्ससोबतच फ्री अनलिमिटेड डेटा

नवी दिल्ली : आपल्या युजर्ससाठी धमाकेदार प्लान रिलायन्स जिओने आणला आहे. केवळ ५९४ रुपयांत जिओने मान्सून हंगामा ऑफर आणली आहे. जिओ या ऑफरमध्ये ६ महिने अनलिमिटेड कॉल्ससोबतच अनलिमिटेड ४ जी डेटादेखील देणार आहे.

५९४ रुपयांच्या या प्लानमध्ये ६ महिन्यापर्यंत अनलिमिटेड फ्री डेटा देण्यात आला आहे. यासोबतच अनलिमिटेड एसएमएसदेखील मिळणार आहेत. याव्यतिरिक्तही आणखी दोन प्लान जिओने बाजारात आणले आहेत. ९९ रुपयांच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉईस कॉलिंगसोबतच फ्री एसएमएस (दररोज १०० एसएमएस) आणि रोज ५०० एमबी ४ जी डेटा दिला जाईल. या प्लानची वॅलिडीटी २८ दिवसांची आहे. हा प्लान मुख्यत्वे जिओ फोन आणि जिओ फोन २ युजर्ससाठी असणार आहे. यानुसार एकूण १४ जीबी डेटाचा लाभ युजर्सना घेता येणार आहे. १५३ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्स दररोज १.५ जीबी ४ जी डेटाचा लाभ २८ दिवस घेऊ शकणार आहे. युजर्सना एकूण ४२ जीबी डेटा मिळणार असून अनलिमिटेड वॉईस कॉल आणि फ्री एसएमएस (रोज १००) मिळणार आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *