जळगाव जिल्हा राज्य शासकीय कर्मचारी पतपेढी तर्फे सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार

जळगाव – जळगाव जिल्हा राज्य शासकीय कर्मचारी सहकारी पतपेढी तर्फे सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार दि.16 सप्टेंबर 2018  रोजी  वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
मार्च 2018 या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या सभासदांच्या पाल्यास इयत्ता 10 वी, 12 वी मध्ये 80 टक्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत.  तसेच पदवी बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी मध्ये 70 टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले असतील तसेच पदवीत्तर एम.ए., एम.कॉम, एमस्सी व शासनमान्य डीग्री, डिप्लोमा या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहे. त्याचप्रमाणे राज्यस्तरीय खेळाडून म्हणून विशेष प्राविण्य प्राप्‍त केलेले असेल अशा सभादांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी सभासदांनी अर्जासह गुण पत्रिकेची साक्षांकित प्रत पतपेढीच्या कार्यालयात दि.31 ऑगस्ट 2018 पर्यंत सादर करावीत असे आवाहन चेअरमन रविंद्र उगले, व्हा.चेअरमन रामदास कचरे व संचालक मंडळाने केले आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *