जिल्ह्यात 37 (1) (3) चे मनाई आदेश जारी

जळगाव :  जळगाव शहरात दिनांक 1 ऑगस्ट 2018 रोजी महानगरपालिका मतदान झाले असुन दिनांक 3 ऑगस्ट 2018 रोजी मतमोजणी होणार आहे. याच काळात मराठा आरक्षण आंदोलनाचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंदचे आवाहन केले आहे. याचा परिणाम जळगाव शहरातील महानगरपालिका निवडणुकांवर होवुन कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राहुल मुंडके यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3)अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत.

हे आदेश दि.1 ऑगस्ट 2018 ते 15 ऑगस्ट 2018 पर्यंत अंमलात राहतील, असेही अपर जिल्हादंडाधिकारी राहुल मुंडके यांनी कळविले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *