३०३ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात; उद्या मतमोजणी 

(जळगाव) महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी १९ प्रभागातील ७५ जागांसाठी ४६९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुकीसाठी ५५ ते ६० टक्क्यांचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला. रात्री उशिरापर्यंत मतदानाची टक्केवारी काढण्याचे काम सुरू होते. शेवटचे मतदान रात्री साडेनऊ वाजता करण्यात आले. मागील पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा दोन ते तीन टक्क्याने वाढ झाली. रात्री उशिरा मतदान केंद्रांवरून सिलबंद मतदार यंत्र पोलिस बंदोबस्तात स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले. उद्या (दि. ३) रोजी मतमोजणी होणार आहे.

महापालिकेची २००३ मध्ये स्थापना झाल्यानंतर ही चौथी पंचवार्षिक निवडणूक होती. निवडणुकीसाठी १९ प्रभागातील ७५ जागांसाठी ३०३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. सकाळी ७.३० वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *