जैन इरिगेशनमध्ये जागतिक छायाचित्र दिवस साजरा
जळगावं, दि. 19 (प्रतिनिधी) – 19 ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो. या दिवशी सन १८३९ साली फ्रेंचसरकारने फोटोग्राफीचे पेटेंट विकत घेतले होते. काही वस्तू, प्रकाश आणि अंधाराचा खेळ यामुळे बदलतात. या तत्त्वातून साधारणत: सन १८०० मध्येकॅमेरा या संकल्पनेची रुजूवात झाली. १८३९ च्या दरम्यान व्यावसायिक छायाचित्र कलेचा जन्म झाला. इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॅमेरा १९९० मध्ये उदयासआला. पुढे सातत्याने डिजिटल कॅमेऱ्यांमध्ये काळानुरूप परिवर्तन होत गेले. हल्ली छायाचित्रण व्यवसाय नावलौकिकाच्या उंबरठ्यावर आहे.
फ्रेंच सरकारने हा दिवस साजरा करण्याचे घोषित केले होते. यंदा हे 179 वे वर्ष होते. या अनुषंगाने जैन इरिगेशनच्या जैन हिल्स स्थित “कांताई”अध्यक्षांचे कार्यालय येथे कॅमे-यांचे पूजन करण्यात आले. कंपनीत स्वतंत्र कला विभाग कार्यरत असून, यात कंपनीशी निगडित विविध कलात्मक कामेकेली जातात. या कामासाठी छायाचित्रांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. जाहिरात क्षेत्रातील वरिष्ठ आनंद गुप्ते तसेच वरिष्ठ पत्रकार डॉ. सुधीर भोंगळेयांच्या हस्ते कॅमेरापूजन करण्यात आले.
यावेळी विभाग प्रमुख मनिष शहा, छायाचित्रकार ईश्वर राणा, राजू हरिमकर, राजेंद्र माळी, धर्मेश शहा, योगेश सोनार, योगेश संधानशिवे, ललित हिवाळे, आरिफ शेख, मुरलीधर बडगुजर, जगदीश चावला तसेच कांताई कार्यालयातील सहकारी उपस्थित होते.
फोटो – जागतिक छायाचित्रदिनानिमित्त कांताई कार्यालयात कॅमेरा पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित जाहिरात क्षेत्रातील वरिष्ठ आनंद गुप्तेतसेच वरिष्ठ पत्रकार डॉ. सुधीर भोंगळे, छायाचित्रकार ईश्वर राणा व इतर सहकारी