जळगाव प्रतिनिधी : भारताच्या 72 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जैन इरिगेशनच्या संपुर्ण देशभरातील विविध आस्थापनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी गुणवंताच्या गौरवासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. बांभोरीयेथील प्लास्टीक पार्क येथे जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य गिरीधारीलाल ओसवाल यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे विपणन प्रमुख अभय जैन जैन परिवाराच्यावतीने उपस्थित होते. यासह फुड पार्क व एनर्जी पार्क येथे पद्मश्री ना. धों. महानोर हे प्रमुख पाहूणे होते. याप्रसंगी जैन फार्मफ्रेश फुडचे संचालक अथांग जैन, कार्यकारी संचालक सुनील देशपांडे उपस्थित होते. ॲग्री पार्क आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन येथे गिमी फरहाद यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अंबिका अथांग जैन उपस्थित होते. टाकरखेडा येथील टिश्यूकल्चर पार्क येथे सावखेडा येथील मंदाबाई सोनवणे, अविनाश जैन, अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेंशीयल स्कूल येथे जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य संघपती दलिचंद जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य जे. पी. राव, अनुभूती इंग्लीश मीडीयम स्कूल येथे डॉ. सुनील नाहटा, ज्योती जैन यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीचे दर्शन घडविले. वाकोद येथील राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय येथे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. डी. एन. कुळकर्णी, दिनेश दीक्षित यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कांताई नेत्रालय येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू अंश पिल्ले, अंशू ओसवाल, भाऊंचे उद्यान येथे लेफ्टनल कर्नल पी. आर. सिंग, सुरेश जैन, एम. बी. कुलकर्णी, महात्मा गांधी उद्यान येथे मेजर हरजिंदर सिंग, प्रविण जैन, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन उपस्थित होते. यासह उदमलपेठ येथे डॉ. अमोल चौधरी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच चित्तुर, बडोदा, भावनगर, हैद्राबाद सह संपुर्ण देशातील कंपनीच्या विविध आस्थापनांमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
#Jalgaon, #JalgaonNews, #jalgaonnews, #jalgaonlive, #jalgaonnewslive, #jainirrigation, #jainirrigationjalgaon, #jainjalgaon, #जळगाव, #जळगावन्युज, #जळगावमहानगरपालिका