दुर्गम भागातील आदिवासी बंधुंना स्वंयंसेवी संस्थांतर्फे मदतीचा हात !

दुर्गम भागातील आदिवासी बंधुंना स्वंयंसेवी संस्थांतर्फे मदतीचा हात !
तोरणमाळ जवळील ज्या दुर्गम आदिवासीबहुल अश्या पाड्यांवर अजुनही प्रशासकिय यंत्रणा पोहचु शकत नाही,अश्या आदिवासी कुटुंबांना मदत करण्यासाठी संवाद फाउंडेशन, पंचशील संस्था, कृष्णकली प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने “एक हात मदतीचा” हा उपक्रम नुकताच तोरणमाळ,ता.धडगाव,जि.नंदुरबार जवळील बुरुमपाड्यात राबविण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर कपडे व अल्पोपहार वाटप करुन आदिवासी बांधवांच्या व विद्यार्थांच्या मुखावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परिसरातील आदिवासी शेतकर्‍यांच्या विविध समस्या-वेदना जाणुन घेतल्या.

संवाद फाउंडेशन, पंचशील सामाजिक संस्था या संस्थांनी भुकेल्यांपर्यंत अन्न पोहचविणे,रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, दगडखाण कामगरांच्या मुलांना मोफत वह्या-पुस्तके वाटप, क्षयरोगमुक्त अभियान व जनजागृती कार्यक्रम असे विविध उपक्रम महाराष्ट्राच्या काना-कोपर्याखत राबवित आपली सामाजिक बांधीलकी जपली आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संवाद फाउंडेशन, पंचशील संस्था, कृष्णकली प्रतिष्ठाण संस्थेच्या मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव आणि वापी येथुन आलेल्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक दायित्वाच्या भावनेतुन यापुढेही अश्या प्रकारचे उपक्रम भविष्यात देखील या भागातील आदिवासी बांधवांसाठी सातत्याने राबवु असा विश्वास यावेळी या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *