नवापुर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कृष्णकली प्रतिष्ठाणची नागरिकांना साद

नवापुर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कृष्णकली प्रतिष्ठाणची नागरिकांना साद

नवापुर पुरग्रस्तांच्या बातम्या सध्या वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांमध्ये झळकत आहेत. काल-परवाच्या अतिवृष्टी-ढगफुटीमुळे आदिवासीबहुल अश्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यात सुमारे ५०० कुटुंबांचा संसार डोळ्यांदेखत वाहुन गेल्याने ही कुटुंब उघड्यावर आली आहेत. या कुटुंबांना जुने कपडे, भांडी, खाद्यपदार्थ,अन्नधान्य आणि जिवनावश्यक वस्तुंची तातडीची मदतीची गरज आहे. समाजातील जागृत नागारिकांनी पुढे केलेला वस्तुरुपी किंवा आर्थिक मदतीचा हात पुरग्रस्तांच्या अंधकारलेल्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचे काम करू शकतो. समाजातील प्रत्येक कुटुंबातून एक जरी हात मदतीला पुढे आला तर पुरग्रस्तांना नवसंजीवनी मिळू शकते. या पुरग्रस्तांच्या संसाराची गाडी रुळावर आणण्यासाठी तसेच त्यांच्या चेहर्‍यावर आनंद आणण्यासाठी नागरिकांनी घरातल्या वापरलेल्या-जुन्या वस्तु द्याव्यात असे आवाहन “कृष्णकली प्रतिष्ठाण” या सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

कृष्णकली प्रतिष्ठाण या संस्थेने महिला सक्षमीकरण, भुकेल्यांपर्यंत अन्न पोहचविणे, गरजु मुलांना मोफत वह्या-पुस्तके वाटप, जनजागृती कार्यक्रम असे विविध उपक्रम महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यात राबवित आपली सामाजिक बांधीलकी जपली आहे. या संपुर्ण सामाजिक उपक्रमासाठी स्वयंसेवक म्हणुन येउ इच्छिणार्‍या व्यक्तींचे देखील स्वागत आहे.

*नागरिकांना जुने कपडे,गाद्या-उशी, भांडी, खाद्यपदार्थ, अन्नधान्य, जिवनावश्यक वस्तु किंवाआर्थिक मदत करायची असल्यास “कृष्णकली प्रतिष्ठाण” या सेवाभावी संस्थेच्या खालील क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क : मोबाईल : ८२३७७८६३७७.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *