अनावश्यक कॉल्सपासून सुटका करणार केंद्र सरकारचे नवे अॅप

नवी दिल्ली : आपल्या मोबाईलवर अनेक वेळा कधीही अनावश्यक कॉल्स येतात. ते कॉल कधी कंपनीचे असतात. पण आता या त्रासदायक कॉल्सपासून सुटका होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने एका नव्या अॅपची निर्मिती केली आहे. ट्रायकडून उमंग व्यासपीठावर डीएनडी २.० नावाचे अॅप नुकतेच सादर करण्यात आले आहे.

हे नवीन अॅप प्लेस्टोअवर जाऊन डाऊनलोड करा आणि आपल्या मोबाईलमध्ये या सुविधेचा वापर करा. त्यामुळे अनावश्यक कॉलपासून सुटका होणार आहे, असे लाँचिंग दरम्यान ट्रायकडून सांगण्यात आले. उमंग या व्यासपीठावरुन हे अॅप डाऊनलोड करण्यात आले आहे. इतर कोणतेही अॅप नको असलेले फोन कॉल्सपासून मुक्ती मिळण्यास याच अॅपचा उपयोग करता येणार आहे.

ग्राहकांना टेलिकम्युनिकेशन मार्केटींग कंपन्या मोबाईवर फोन करुन आपल्या कंपनीच्या सुविधाची माहिती देण्यात प्रयत्न करत असता. झोपेच्यावेळेत असे कॉल अनेकवेळा येतात. त्यामुळे झोपमोड होते. यातून सुटका होण्याकरिताच ट्रायने मागील वर्षी ‘माय स्पीड’ आणि ‘माय कॉल’ या नावाचे अॅप लॉच करण्यात आले होते.

मागील वर्षांपासून केंद्र सरकारकडून डिजिटल इंडियाचे प्रमोशन आणि एक सरकारी सेवा देणारी यंत्रणा यांना एकाच पातळीवर समातर ठेवण्याकरिता प्रयत्न सुरु आहेत. मागील जूनमध्ये यात उमंग अॅप लाँच करण्यात आले होते. सुरुवातीला गॅस बुकिंग, सरकारी दवाखाने आणि महत्वाच्या सेवाकरिता आठ सुविधाचा समावेश या अॅपमध्ये करण्यात आला होता, असे स्पष्टीकरण ट्रायकडून देण्यात आले आहे. आणखी १०० हून जादा सुविधाचा या अॅपमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *