जमिनीवर पाय असलेले उत्तुंग व्यक्तीमत्व : अशोक भवरलाल जैन

जमिनीवर पाय असलेले उत्तुंग व्यक्तीमत्व !

     भारताचे माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त  आज सायंकाळी कळाले. सर्वसामान्य जनतेच्या मनात सर्वाधिक लोकप्रियतेचे स्थान असलेले अटलजी हे विसाव्या शतकातील एकमेव नेते होते. संवेदनशिल राजकारणी, कविमनाचे सहृदयी व्यक्तीमत्व आणि प्रचंड व्यासंग असलेले अटलजी यांचे कार्यकर्तृत्व एकमेवाव्दितीय आहे. अटलजींची अमोघ वकृत्वशैली अनुभवण्याची संधी मला दोन वेळा जळगाव येथेच मिळाली. एकदा शालेय जीवनात आणि दुसऱ्यांदा महाविद्यालयीन जीवनात. दोन्हीपैकी एक सभा जुन्या कॉटन मार्केट परिसरात (आताचे वल्लभदास वालजी मार्केट) आणि दुसरी जी.एस.ग्राऊंडवर झाल्या होत्या. तेव्हा अटलजी जनसंघाचे नेते होते. जनसंघाचा फारसा प्रचार-प्रसार झालेला नव्हता. परंतू उत्तम वक्ता म्हणून अटलजींचा लौकिक असल्यामुळे सर्वच वयोगटातील श्रोते त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी करीत त्यात आम्हीपण होतो.

पंतप्रधानपदी अटलजी असताना गुजरातमध्ये भूकंप झाला होता. तेथे पुनर्निमाण कार्य करीत असताना ७०० शाळांचे बांधकाम अखिल भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने झाले होते या शाळांसाठी प्लास्टीक पत्रे पुरविण्याचे काम जैन उद्योग समूहाने केले होते. अशी मदत करणाऱ्या संस्थांचा सत्कार तेव्हा अटलजींच्या शुभहस्ते करण्यात आला होता. या कार्यक्रमात जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय भवरलालजी जैन यांचाही सत्कार करण्यात आला होता. तेव्हा उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, मुख्यमंत्री केशुभाई पटेल व जैन संघटनेचे शांतीलालाजी मुथा उपस्थित होते.

अटलजींच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू आपण पाहतो. कवीतेतून त्यांनी आपले विचार खुले पणाने मांडले आहे. माणसाच्या मोठेपणाविषयी अटलजी स्वतः म्हणतात,

“ मेरे प्रभु

मुझे इतनी उचाई कभी मत देना

गैरों को गले न लगा सकू

इतनी रूखाई कभी मत देना”

माणसे कितीही मोठी झाली तरी त्यांचे पाय जमिनीवर हवेत आणि त्यांचा संपर्क सर्व सामान्य माणसाशी हवा असा विचार करणारे अटलजी नंतर तिन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. अटलजी राजकारणातून हळूहळू बाजूला झाले. परंतु सर्व सामान्यांच्या मनात उत्तुंग उंची कायम राहिली अशा महनिय व्यक्तिमत्वाला मनःपुर्वक श्रद्धांजली!

–    अशोक भवरलाल जैन,

अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि, जळगाव.

#Jalgaon, #JalgaonNews, #jalgaonnews, #jalgaonlive, #jalgaonnewslive, #jainirrigation, #jainirrigationjalgaon, #jainjalgaon,

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *