अॅपल घेऊन येत आहे ड्युएल सिम सपोर्टसोबत आयफोन

मुंबई : ड्युएल सिम सपोर्ट असणाऱ्या स्मार्टफोनची भारतात चांगलीच चलती आहे. त्याचप्रमाणे स्टेट्स सिम्बॉल म्हणून ओळख असणाऱ्या आयफोनचीही क्रेझ तरुणांमध्ये दिसून येते. पण आयफोनमध्ये आत्तापर्यंत ड्युएल सिमची सुविधा उपलब्ध नाही. अनेक भारतीय त्यामुळेच आयफोन घेण्याची आपली इच्छा मागे टाकतात. पण आता आपल्या युझर्ससाठी पुढच्या आयफोनमध्ये ड्युएल सिम सपोर्टची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सिमस्लॉटचा उल्लेख iOS 12 च्या डायग्नोस्टिक रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये असणाऱ्या दुसऱ्या सिम स्टेटसमुळे iOS 12 मध्ये दोन सिम वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. आयफोनच्या एका व्हेरिएन्टमध्ये येत्या सप्टेंबरपर्यंत ड्युएल सिम सपोर्ट दिला जाईल, असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी तीन नवे आयफोन लॉन्च करणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *