जळगावमध्ये दोन कारच्या अपघातात चार ठार

accident
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबादजवळ दोन मोटारींची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात पाचजण जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बुधवारी मध्यरात्री नशिराबाद येथे काझी पेट्रोलपंपाजवळ हा भीषण अपघात झाला. दोन्ही कार समोरासमोर आल्याने झालेल्या धडकेत कारमधील चारजणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका कारचा चालक प्रिन्स अग्रवालचा समावेश आहे. मृतांमधील चारपैकी तीनजण जळगावमधील असल्याचं सूत्रांनी सांगितलं. हा अपघात अत्यंत भीषण होता. समोरासमोर आलेल्या दोन्ही कारनी एकमेकांना धडक दिल्याने या अपघातात दोन्ही कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तक्रार नोंदविली असून अधिक तपास करत आहेत.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *