कॅरम जागतिक स्पर्धेसाठी आयशा मोहम्मद ला शुभेच्छा व निरोप.

जळगाव- साउथ कोरिया येथे सुरु होणाऱ्या ५ व्या जागतिक कॅरम स्पर्धेसाठी भारतातर्फे जैन इरीगेशन ची खेळाडू आयशा मोहम्मद हिची निवड झाली असून ती आज सोमवारी दिल्ली साठि रवाना झाली तत्पुर्वी तिला जैन स्पोर्ट्स अकादमी चे खेळाडू,प्रशिक्षक,महिला मंडल यांच्या वतीने कांताई सभागृहात निरोप व शुभेच्या देण्यात आल्या या वेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संघपति दलीचंद जी जैन, तर प्रमुख अतिथि म्हणून आमदार चंद्रकांत सोनवणे,जेष्ठ विधि तज्ञ एडवोकेट सुशील अत्रे होते.
सर्व प्रथम जैन स्पोर्ट्स चे क्रीड़ा समन्वयक फ़ारूक़ शेख यांनी आयशा चा क्रीड़ा क्षेत्रचा आढावा सादर केला त्यात तिने अद्याप ४५ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत,दोन वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत, एक वेळा एशियन स्पर्धेत व २००७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झाली असून आता २६ ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या ५व्या वर्ल्ड कप स्पर्धे साठि साउथ कोरिया ला जात असून त्या ठिकाणी १८ देशांचा समावेश असल्याची माहिती दिली.
दुसऱ्यांदा महाराष्ट्र ची प्रतिनिधित्त्व करणारी आयशा ही एकमेव खेळाडू असून या पूर्वी महाराष्ट्रातील संगीता चाँदोरकर व अनुपमा केदार यांची निवड झालेली होती.
एडवोकेट अत्रे यांनी अत्यंत मार्मिक व भावनिक शुभेच्या देऊन शाल व श्रीफ़ल दिले तर आमदार सोनवणे यांनी शासनाच्या वतीने आयशा ची दखल घेण्याचे व खेळाडू साठि संघर्ष करण्याचे आश्वासन देऊन आयशाला स्मृति चिन्ह देऊन गौरव केला  संघपति दलु बाबा यांनी आशीर्वाद पर आपले भाषण देऊन तीस शुभेच्या देत क्रीड़ा साहित्य देऊन सत्कार केला.
 त्या नंतर उपस्थित महिला मंडल तर्फे राजी नायर,सरिता  खाचने, सौ कमलेश शर्मा,विजया पांडे यांनी तर महिला हॉकी तर्फे प्रो डॉ अनिता कोल्हे,माधुरी भारुडे, निशा कोंडालकर,ममता बरहाटे, गायत्री सालुंके,पाटिल कीर्ति , फुटबॉल तर्फे आशुतोष शुक्ल,किशोर मराठे, गौरव ठाकुर, प्रशिक्षक तर्फे अरविंद देशपांडे,अब्दुल मोहसिन,लियाकत अली ,अजित घारगे,वाल्मीक पाटिल,संजय पाटिल,सय्यद बादशाह,प्रवीण ठाकरे यांनी तसेच क्यारम असो तर्फे मंजूर खान यांनी सत्कार केला
आयशा यांनी अत्यंत निर्भिड पणे सत्कार ला उत्तर देताना निश्तिच भारता साठि स्वर्ण पदक आणू असा विश्वास व्यक्त केला।
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सरिता खाचने यांनी तर आभार अरविंद देशपांडे यांनी मानले
कार्यक्रमास क्रीड़ा क्षेत्रातील मान्यवर हजर होते
मा अशोक भाऊ व अतुल भाऊ यांनी आयशा ला शुभेच्या दिल्या.
#Jalgaon, #JalgaonNews, #jalgaonnews, #jalgaonlive, #jalgaonnewslive, #jainirrigation, #jainirrigationjalgaon, #jainjalgaon, #जळगाव, #जळगावन्युज #जळगावमहानगरपालिका
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *